Join us  

महिलेला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे, मालाड पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:04 PM

पीडित महिला विनया (नावात बदल) या ओशिवरा परिसरात राहतात. मालाडच्या एका मॉलमध्ये त्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना पहिला फोन आला.

मुंबई: अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन व्हिडीओ कॉल करत महिलेला अश्लील चाळे करुन दाखवण्याचा प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात मालाड आणि बिकेसी सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

पीडित महिला विनया (नावात बदल) या ओशिवरा परिसरात राहतात. मालाडच्या एका मॉलमध्ये त्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना पहिला फोन आला. त्यांनी फोन रिसिव्ह केला तेव्हा त्यावर एक इसम गुप्तांग दाखवत अश्लील चाळे करत असताना त्यांना दिसला. त्यामुळे त्यांनी तो फोन डिस्कनेक्त केला. मात्र, त्यानंतर देखील त्यांच्या मोबाईलवर जवळपास 15 व्हिडीओ कॉल करण्यात आल्याचे त्यांनी पाहिले. अखेर त्यांनी याप्रकरणी ओशिवरा आणि नंतर मालाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तसेच याबाबत सायबर सेल पोलीस ठाण्यातही त्यांनी कळवले आहे. त्यानुसार पोलीस त्या माथेफिरुचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी