Join us  

जादा वीजदर आकारणी विरोधी याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 2:43 PM

extra electricity tariff : विनाकारण दुप्पट सेवा जोडणी आकार

मुंबई : उच्चदाब जोडणी असलेली बिगर शासकीय व खाजगी सर्व प्रकारची वसतिगृहे, खाजगी शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेली विद्यार्थी वसतिगृहे आयोगाच्या नवीन आदेशानुसार १ एप्रिलपासून सार्वजनिक सेवा अन्य या कमी वीज दराने आकारणी होण्यासाठी पात्र आहेत. मात्र त्यांच्यावर अद्यापही लघुदाब घरगुती या जादा वीज दराने आकारणी केली जात आहे. या मुद्द्यावर आयोगाने योग्य ते दुरुस्ती आदेश द्यावेत यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आयोगासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे.  भूमिगत व्यवस्था असलेल्या शहरी भागात नवीन भूमिगत वीज जोडणी घेताना सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना विनाकारण दुप्पट सेवा जोडणी आकार भरावा लागत आहे. तोही ऑर्डरनुसार योग्य लागणे आवश्यक आहे. या मुद्द्यावरही आयोगाने योग्य ते दुरुस्ती आदेश द्यावेत यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली. संबंधित सर्वच वीज ग्राहकांनी वीज देयके तपासावीत. जादा आकारणी सुरु असल्यास त्वरित वीजदर वर्गवारी बदल मागणीचे अर्ज दाखल करावेत. १ एप्रिलपासून जादा घेतलेल्या रकमा संबंधित वीज ग्राहकांना व्याजासह त्यांच्या वीज बिलांद्वारे परत करण्यात याव्यात, अशीही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :वीजमुंबईमहाराष्ट्रमहावितरणसरकार