Join us  

उर्मिला मातोंडकर विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 8:47 AM

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविरोधात भाजपाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

मुंबई  : काँग्रेसमध्ये नुकतीच सहभागी झालेली आणि उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविरोधात भाजपाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

उर्मिला मार्तोंडकर हिने एका टीव्ही शोमध्ये बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वा इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला उर्मिला मार्तोंडकर हिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दरम्यान तिने हिंदू धर्म हा जगातील सर्वात जास्त हिंसाचार घडवणार धर्म असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी केलेव्या वक्तव्यामुळे माझ्यासारख्या अनेक हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी ही सर्व वक्तव्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून केली आहेत. त्यामुळे उर्मिला मातोंडकर, राहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली, असे नाखवा यांनी म्हटले आहे.

धर्माबद्दल केला मोठा खुलासाअभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ऊर्मिला मातोंडकरनं धर्माबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, माझे पती मुसलमान असले तरी मी हिंदूच आहे आणि त्याचा आम्हा दोघांनाही गर्व आहे. आपल्या देशात एक प्रकारची विविधता आहे. ज्याला जसं राहायचं आहे, तसं तो राहू शकतो.

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक, अनेक धक्कादायक निकालउत्तर मुंबई या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. 2004 साली ज्येष्ठ भाजपा नेते राम नाईक यांच्याविरोधात काँग्रेसने अभिनेता गोविंदाला मैदानात उतरविले होते. काँग्रेसची ही खेळी यशस्वी ठरली. 2009 साली गोविंदाने माघार घेतल्याने संजय निरुपम यांना उमेदवारी मिळाली आणि मनसे फॅक्टरमुळे तेही यशस्वी ठरले. सेलिब्रिटी विरुद्ध राजकीय कार्यकर्ता अशा लढाईमुळे पुन्हा ‘गोविंदा इफेक्ट’ नाही ना होणार, अशी धास्ती भाजपा पदाधिकाऱ्यांना आहे. 

टॅग्स :उर्मिला मातोंडकरभाजपामुंबईलोकसभा निवडणूक