सोनसाखळी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:07 IST2021-02-13T04:07:17+5:302021-02-13T04:07:17+5:30

मुंबई : बालपणीचा मित्र असल्याची बतावणी करून ठगाने एका चार्टर्ड अकाउंटंटच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी लंपास केल्याचा प्रकार सीएसएमटी ...

Filed a case of gold chain theft | सोनसाखळी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

सोनसाखळी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : बालपणीचा मित्र असल्याची बतावणी करून ठगाने एका चार्टर्ड अकाउंटंटच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी लंपास केल्याचा प्रकार सीएसएमटी रेल्वे टर्मिनन्स येथे नुकताच समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आझाद मैदान पोलीस अधिक तपास करीत आहेत.

................................

बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टाेळीची चौकशी सुरू

मुंबई : बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीने आतापर्यंत अनेकांना अशा प्रकारे प्रमाणपत्र मिळवून दिल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. अटक करण्यात आलेल्या या टाेळीची अधिक चाैकशी करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉप, मोबाइलद्वारे पथक अधिक तपास करीत आहे.

.....................................

रस्ते सुरक्षेबाबत ट्विटरवरून जनजागृती

मुंबई : रस्ते सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून जनजागृती सुरू केली. अपघात राेखण्यासाठी तसेच जीव वाचविण्यासाठी हेल्मेटचा वापर करा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याला तरुणाईचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

...................................

Web Title: Filed a case of gold chain theft