किरकोळ वादातून हाणामारी
By Admin | Updated: July 6, 2015 23:42 IST2015-07-06T23:42:30+5:302015-07-06T23:42:30+5:30
येथील विशीतल्या काही पोरकट तरुणांतील गेले काही दिवस सुरू असलेल्या वादाचे पर्यावसन रविवारी हाणामारीत झाले. या घटनेनंतर हिंदू-मुस्लीम समाजात तणाव निर्माण झाला होता.

किरकोळ वादातून हाणामारी
रोहा : येथील विशीतल्या काही पोरकट तरुणांतील गेले काही दिवस सुरू असलेल्या वादाचे पर्यावसन रविवारी हाणामारीत झाले. या घटनेनंतर हिंदू-मुस्लीम समाजात तणाव निर्माण झाला होता.
रोहा पोलिसांच्या समयसुचकतेने जिल्हाभरातून राखीव पोलिसांच्या तुकड्या बोलविण्यात आल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसून शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रोह्यात गेले काही दिवस रोडरोमियोंनी उच्छाद मांडलेला आहे. यात विशिष्ट समाजाच्या मुलांकडून रोड रोमियोगिरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. एकमेकांच्या समाजाविरुद्ध जाहीर वक्त व्य करून आव्हान देण्यापर्यंत प्रकार गेला.
हनुमान टेकडी, मारुती चौक आणि श्री धावीर मंदिर रोड येथे या वादास तोंड फुटले आणि रात्री याचे पर्यावसन अखेर फिरोज टॉकीज येथे हाणामारीत झाले. या मारहाणीचा प्रकार रात्री काही मंडळींनी पुढाकार घेवून मिटविला होता. मात्र तरीही काही समाजकंटकांनी वाद वाढविण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)
गुन्हे दाखल
सोमवारी तणाव निवळला असला तरी पोलीस बंदोबस्त कायम आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हक रोह्यात आहेत. या प्रकरणात काही तरुणांवर गुन्हे दाखल झाले असले तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.