पन्नास टक्के आमदार दहावीच!

By Admin | Updated: October 21, 2014 04:41 IST2014-10-21T04:41:23+5:302014-10-21T04:41:23+5:30

विधानसभा निवडणुकीत लॉटरी लागलेले बहुतांश नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. हे सर्व आमदार व्यावसायिक असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी लढणार की वैयक्तिक कामांसाठी

Fifty percent of the MLAs are tenth! | पन्नास टक्के आमदार दहावीच!

पन्नास टक्के आमदार दहावीच!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत लॉटरी लागलेले बहुतांश नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. हे सर्व आमदार व्यावसायिक असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी लढणार की वैयक्तिक कामांसाठी, हे येणारा काळच ठरविणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले बहुतांश उमेवार हे व्यावसायिक आहेत. तर काहींचा समाजसेवा हा व्यवसाय असल्याचे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. परंतु आपला नेमका व्यवसाय काय, याला उमेदवारांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांतील जवळपास ३0 नवनिर्वाचित आमदार हे व्यावसायिक आहेत. यामधील १७ उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. यामध्ये चांदिवली मतदारसंघाचे आमदार नसीम खान यांनी सर्वात कमी म्हणजे प्राथमिक शिक्षण घेतले आहे.
मुलुंड मतदारसंघातून विजयी झालेले सरदार तारासिंह हे दहावी अनुत्तीर्ण असून ते व्यावसायिक आहेत. तसेच विक्रोळी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांचे शिक्षण बारावी आहे. तसेच त्यांचा स्वत:चा अ‍ॅडव्हर्टायझिंगचा व्यवसाय आहे. दिंडोशी मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू यांचे बारावी शिक्षण झाले आहे. ते कमिशन एजंटचा व्यवसाय करतात. याचप्रमाणे चारकोप मतदारसंघाचे भाजपाचे आमदार योगेश सागर यांचे अकरावी शिक्षण झाले असून, त्यांचाही स्वत:चा व्यवसाय आहे.
गोरेगाव मतदारसंघातून भाजपाच्या विद्या ठाकूर विजयी झाल्या आहेत. त्या गृहिणी असून त्यांचे आठवी शिक्षण झाले आहे. त्यांचे पती डेव्हलपर आहेत. तसेच अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके विजयी झाले आहेत. ते दहावी पास असून, त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. ते मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत.
घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार प्रकाश महेता हे दहावी झाले असून, राजकारण हाच त्यांचा व्यवसाय आहे. अणुशक्तीनगरचे शिवसेना आमदार तुकाराम काते हे नववी नापास असून, ते शेतकरी आहेत. त्याचप्रमाणे चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्फेकर हे दहावी शिकले असून, त्यांचा केबल नेटवर्किंगचा व्यवसाय आहे. तसेच कुर्ला मतदारसंघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांचेही शिक्षण दहावी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fifty percent of the MLAs are tenth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.