त्या जीवघेण्या पाणपोईला नवसंजीवनी!
By Admin | Updated: February 6, 2015 23:12 IST2015-02-06T23:12:13+5:302015-02-06T23:12:13+5:30
येथिल शिवसेना मध्यवर्तीशाखे लगत १९९२ मध्ये बांधण्यात आलेली पाणपोई काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या १५ वर्षांपासून बंद होती.

त्या जीवघेण्या पाणपोईला नवसंजीवनी!
अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
येथिल शिवसेना मध्यवर्तीशाखे लगत १९९२ मध्ये बांधण्यात आलेली पाणपोई काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या १५ वर्षांपासून बंद होती. त्यातच रस्ता रुंदीकरणाच्या त्या वास्तूचा बहुतांशी भाग हा फुटपाथावर आल्याने अनेक पादचा-यांच्या डोक्याला लागून अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ती काढून टाका यासाठी डोंबिवलीकरांनी महापालिकेत तक्रारी दिल्या होत्या. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक केतन दुर्वे यांनी ही वास्तवता जाणून घेत, बंद असलेल्या पाणपोइत अनेक बदल केले. त्यासाठी जे.जे. च्या अनुभवी आर्टीस्टचे सहकार्य घेत सुंदर-सुबक असे म्यूरल तयार करुन त्यास नवसंजीवनी दिली.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवली शहर शिवसेना शाखेच्या वतीने बुधवारी त्याचा लोकार्पण सोहळा करण्यातआले.
नव्याने बांधण्यात आलेली पाणपोइ ही सध्याच्या पदपथापासून बाजूला असल्याने ती जीवघेणी ठरणार नसल्याचा विश्वास दुर्वे यांनी व्यक्त केला. त्यानुसार नव्याने रचना करत तयार करण्यात आलेले भित्तीशिल्प हे डोंबिवलीकरांसाठी आकर्षण ठरले आहे.
दुर्वेंनी २०११-१२ मध्ये या पाणपोईच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव महापालिकेतून मंजूर करुन घेतला. महापालिकेनेही त्यास मंजूरी दिली. आता तेथील पुढील दिशेला ते शिल्प असून त्या मागे पाण्याचे दोन नळ आहेत. त्यामुळे पादचा-यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतल्याचे सांगण्यात आले. या नव्या रचनेत ‘पाणी वाचवा’ हा संदेशही देण्यात आला आहे. आता या नव्या पाणपोईला कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भित्तीशिल्पासाठी अशोक साळगावकर, किरण वैद्य या अनुभवींनी ही संकल्पना राबवण्यास सांगितले, त्यातच ज्येष्ठ शिवसैनिक विजय देशमुख यांनीही नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध क्लृप्त्या सुचवल्या. विशीष्ट असे चित्र साकारण्यात आले. ते कार्व्हिंग करुन घेतले. त्यात वीटेलाच पर्याय असलेल्या सिपोरेक्सच्या ६० ब्लॉक्सचा वापर करण्यात आला आहे. ते सर्व ब्लॉक्स एकत्र करत विशीष्ट पद्धतीने एकमेकांना जोडले असून ‘शिल्प’ साकारण्यात आले. त्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या प्रसन्न चुरी आणि रवींद्र सावंत यांचे योगदान मोलाचे होते. या सर्वांचा खासदार शिंदेंनी यथोचित सन्मान करत एक चांगली कलाकृती डोंबिवलीकरांसाठी दिल्याबद्दल कौतुकही केले.