लुटीच्या उद्देशाने तरुणावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:36 IST2018-10-26T23:36:31+5:302018-10-26T23:36:32+5:30

लुटीच्या उद्देशाने तरुणावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना वडाळ्यातील संगमनगर परिसरात घडली.

Fierce attack on youth for robbery purpose | लुटीच्या उद्देशाने तरुणावर जीवघेणा हल्ला

लुटीच्या उद्देशाने तरुणावर जीवघेणा हल्ला

मुंबई : लुटीच्या उद्देशाने तरुणावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना वडाळ्यातील संगमनगर परिसरात घडली. यामध्ये दादरच्या मनीष मार्केटमधील मोबाइल दुकानात काम करणाऱ्या राशिद तन्वीरल अन्सारी (२४) जखमी झाला आहे. अन्सारीची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी प्रमुख आरोपी गोलू व वसीम चिकना यांना अटक केली असून, गालिब, आसिफ व मोहम्मद टकला यांचा तपास सुरू आहे. वडाळा संगमनगरमध्ये राहणारा राशिद हा गुरुवारी रात्री आपल्या एका मित्रासह पाणी पिण्यासाठी परिसरातील एका हॉटेलमध्ये गेला होता.

Web Title: Fierce attack on youth for robbery purpose