काल्पनिक सुपरहीरो अवतरणार

By Admin | Updated: February 5, 2015 12:06 IST2015-02-05T12:05:41+5:302015-02-05T12:06:52+5:30

उलगडला 'बाजी' चित्रपटाचा प्रवास : श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, दिग्दर्शक निखिल महाजन 'लोकमत' कार्यालयात

Fictional superheroes may come out | काल्पनिक सुपरहीरो अवतरणार

काल्पनिक सुपरहीरो अवतरणार

>मुंबई : आपल्याकडे काल्पनिक गोष्टी आवडीने वाचल्या जातात. याच गोष्टींच्या धर्तीवर बनलेला 'बाजी' चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने 'बाजी' चित्रपटातील श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी,अमृता खानविलकर आणि दिग्दर्शक निखिल महाजन यांनी लोकमत कार्यालयात भेट दिली आणि मनोरंजक गोष्टींचा पटच यानिमित्ताने उलगडला. 
चित्रपटासाठी श्रेयसला थरारक दृश्ये देताना हातालाही दुखापत झाली. पण मराठमोळा सुपरहीरो साकारण्यासाठी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. बाजी हा सामान्य माणसासारखाच हीरो आहे. सामान्य लोकही त्याला आपल्यात बघू शकतात, असे श्रेयसने सांगितले. तसेच सुपरहीरो साकारताना त्यात व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर कमी करण्यातआला आहे, असे श्रेयसने सांगितले. 
साईनाथ तेरगावनंतर मार्तंडसारखा खलनायक रंगवण्यासाठी जितेंद्रलाही मेहनत घ्यावी लागली. मार्तंड हा स्वत:चे निरस जगणं जगतोय. त्याला दरम्यान भूतकाळातल्या गोष्टींची उकल होऊन जगण्यातला दुष्ट उद्देश सापडतो, असे जितेंद्रने सांगताना आम्ही चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेऊन झाली आहे. इतका भव्य स्तरावरचा तद्दन व्यावसायिक सिनेमा हा ६ कोटींमध्ये बनला आहे. पण तो पडद्यावर बघताना त्याची भव्यता अंगावर येते, असेही जितेंद्रने सांगितले.
माझ्यासारख्या ग्लॅमरस मुलीला 'नो मेकअप लूक' देण्याचं श्रेय हे निखिलचं असल्याचे अमृता म्हणाली. श्रेयस, जितेंद्रबरोबर काम करण्याचं खूप दडपण होतं. गौरी करताना खूप मजा आली, असेही अमृता म्हणाली.
दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाला की, बाजीसारखा काल्पनिक चित्रपट करताना लोकांना सिनेमॅटिक एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे हे डोक्यात होतं. त्याप्रमाणे लोकांच्या आवडीचा विचार केला. मला 'त्या' प्रकारचे शो आवडत नाहीत - श्रेयस 
सध्या चर्चेचा विषय असलेल्या वादग्रस्त 'एआयबी' व्हिडीओबद्दल श्रेयसला विचारले असता, मला 'त्या' प्रकारचे शो आवडत नसल्याचे स्पष्टीकरणही त्याने दिले. आणि आजची तरुणाई अशा प्रकारच्या बॉलीवूड कलाकारांना 'रोल मॉडेल' म्हणत अनुकरण करत असेल तर ते चुकीचेच आहे, त्यावर पुन्हा आत्मकेंद्री होऊन विचार करावा.
 
सामान्यांच्या मनातील वृत्ती
बाजी हा हीरो नसून ती वृत्ती आहे. एखादी घटना घडल्यास ती वृत्ती जागी होते आणि त्यानंतर लोकांसाठी, समाजासाठी लढा देते. त्यामुळे हा 'बाजी' हिंदी चित्रपटसृष्टीतील तथाकथित सुपरहीरोंप्रमाणे नसून सामान्यांमधला आहे.
 
'तो' प्रकार उत्साहाच्या भरात - अमृता खानविलकर
बाजी चित्नपटाच्या प्रमोशनसाठी नाशिकच्या एका कॉलेजमध्ये गेलेली अमृता दगडफेकीत जखमी झाली. टवाळखोरांनी भिरकावलेला दगड अमृताच्या कानाजवळ लागला या दिवसभर चालू असलेल्या चर्चेबाबतअमृता म्हणाली की, ही दगडफेक कुणी जाणीवपूर्वक केलेली नसावी, उत्साहाच्या भरात हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे

Web Title: Fictional superheroes may come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.