मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कमी रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST2021-07-07T04:08:13+5:302021-07-07T04:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट दिसून आली आहे. गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत ...

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कमी रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट दिसून आली आहे. गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णांची नोंद सोमवारी झाल्यानंतर मंगळवारी त्याहून कमी ४५३ बाधित आढळून आले आहेत. तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर मात्र ०.०८ टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ८२२ दिवसांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख २५ हजार ६२० रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ९९ हजार ८२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ५६४ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ९०८ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी मृत्युमुखी पडलेल्या दहा रुग्णांपैकी चार रुग्णांना सहव्याधी होत्या.
मृतांमध्ये सहा पुरुष, तर चार महिला रुग्णांचा समावेश होता. सहा मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर चार रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३० हजार ५५४ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ७३ लाख ५३ हजार ७३७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.