‘क्रिकेट वर्ल्डकप’चा फिवर

By Admin | Updated: February 16, 2015 23:07 IST2015-02-16T23:07:28+5:302015-02-16T23:07:28+5:30

क्रि केटच्या विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात संयुक्तपणे या चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.

Fever of 'Cricket World Cup' | ‘क्रिकेट वर्ल्डकप’चा फिवर

‘क्रिकेट वर्ल्डकप’चा फिवर

क्रि केटच्या विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात संयुक्तपणे या चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटवेड्या आपल्या देशात क्रिकेटचे महत्त्व काही औरच आहे. तरु णाईला याची भुरळ पडलेली असून विश्वचषकादरम्यान भारतीय संघाला चीअर करण्यासाठी वेगवेगळ्याप्रकारे प्लानिंगची सुरुवात तरुणांनी केली आहे. दीड महिना चालणाऱ्या या विश्वचषकात ४९ सामने खेळविले जाणार आहेत. त्यापैकी काही सामन्यांना सुरुवातही झाली असून भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानला भारताने नुकतेच पराजित करून विश्वचषकाची रंगत वाढवल्याने सगळीकडेच जल्लोषाचे वातावरण आहे.
काही महाविद्यालयीन तरुणांनी मॅचच्या दिवशी कॉलेजला बंक मारण्यास सुरुवात केली आहे. शहरी भागात जेवढी उत्सुकता या सामन्यासाठी आहे, तेवढीच उत्सुकता ग्रामीण भागातील तरु णांमध्येही आहे. फॅशनच्या युगात बाजारात भारताच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे टी-शर्टही दाखल झाले असून या तरुणवर्गाचा कल अशा प्रकारच्या खरेदीकडे वाढलेला दिसून येत आहे. गत विश्वविजेता भारतीय संघाने विश्वचषकाच्या साखळी सामन्यात विजयी सुरुवात करून क्रिकेट रसिकांना आनंद देण्याला सुरुवात केली आहे.

च्क्रि केट सामने पाहण्यासाठी मित्र एकमेकांच्या घरी जमून सामन्यांचा आनंद लुटतात, तसेच अनेक जण भारताच्या सामन्यादरम्यान चेहऱ्यावर भारताचा तिरंगा रंगवताना दिसत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकच्या प्रोफाईललाही सध्या असेच तिरंगी रंगाने रंगवलेले फोटो दिसू लागलेले आहेत.

एकही सामना मिस करणार नाही
भारतीय संघाचा एकही सामना मिस होणार नाही, असे प्लॅनिंग आहे. चार वर्षांनी येणारा विश्वचषक म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच आहे. पाकिस्तान संघाला पराभूत करून भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असल्याचे सिध्द झाले आहे. मॅच पाहण्यासाठी सगळे मित्र एकत्र येऊन सामन्यांचा आनंद लुटणार आहोत.
- करण गायकर, नवी मुंबई

क्रिकेटसाठी सुट्ट्या
भारताचा एकही सामना माझ्याकडून पाहण्यातून सुटत नाही आणि त्यात विश्वचषक म्हणजे क्रि केटमधील सर्वात मोठी लढत पाहण्याची एक सुवर्णसंधी. या चषकादरम्यान अनेक रेकॉर्ड तयारही होतात. मी खाजगी कंपनीत कार्यरत असून ठरावीक सामन्यांसाठी सुट्टी टाकली आहे. भारताच्या उर्वरित सामान्यांची मोठी उत्सुकता मला लागली आहे.
- रोशन पाटील, कळंबोली

विश्वचषकाची उत्सुकता कायम
मी स्वत: एक चांगला क्रि केटर असल्याने काही महिन्यांपासूनच विश्वचषकाची उत्सुकता होती. विश्वचषक सुरू झाला आणि भारताच्या दमदार विजयाने त्याची सुरु वात देखील झाली आहे. मी या सामन्यासाठी माझ्या कामाच्या ठिकाणी वैयक्तिक सुट्ट्या राखीव ठेवल्या होत्या, त्यामुळे या सुट्ट्या केवळ आणि केवळ या सामन्यांसाठी घालवणार आहे.
- गणेश म्हात्रे, पनवेल

सकाळी लवकर उठतो
एखादा सण, उत्सव घरी असताना जो आनंद असतो तसा आनंद मला विश्वचषकादरम्यान होतो. यावर्षी विश्वचषकाचे सामने परदेशात आहेत. सकाळी लवकर हे सामने सुरू होतात. इतर दिवशी मी झोपेतून उशिरा उठतो मात्र विश्वचषकादरम्यान मी सामने पाहण्यासाठी आवर्जून लवकर उठतो. रविवारी भारताने मिळवलेला विजय हा अवर्णनीय असाच होता.
- विशाल नाईक, खारघर

 

Web Title: Fever of 'Cricket World Cup'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.