‘गेट-वे’वरील फेरी बोट तीन दिवस बंद
By Admin | Updated: November 29, 2014 01:18 IST2014-11-29T01:18:41+5:302014-11-29T01:18:41+5:30
नौदलाकडून सध्या नौदल सप्ताह साजरा केला जात असून, गेट वे ऑफ इंडिया येथे होणा:या सोहळ्यासाठी तीन दिवस फेरी बोट सेवा बंद ठेवली जाणार आहे

‘गेट-वे’वरील फेरी बोट तीन दिवस बंद
मुंबई : नौदलाकडून सध्या नौदल सप्ताह साजरा केला जात असून, गेट वे ऑफ इंडिया येथे होणा:या सोहळ्यासाठी तीन दिवस फेरी बोट सेवा बंद ठेवली जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव 2 ते 4 डिसेंबर्पयत या फेरी बोट बंद ठेवल्या जातील, असे नौदलाने स्पष्ट केले आहे. नौदल सप्ताह साजरा करतानाच यामध्ये नौदलाकडून ‘बीटिंग रिट्रेट’ सोहळाही साजरा केला जाणार आहे. बीटिंग रिट्रेट सोहळा म्हणजे युद्ध संपल्यानंतर जो आनंद साजरा केला जातो तो. तशाच प्रकारचा प्रदर्शनरूपी सोहळा गेट वे ऑफ इंडियावर सर्वसामान्य जनतेसाठी केला जाणार असल्याचे नौदलातर्फे सांगण्यात आले. हेलिकॉप्टर्सची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 2 डिसेंबर रोजी सकाळी 1क् वाजल्यापासून ते 4 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेर्पयत फेरी बोट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)