महिला गटशिक्षणाधिका-याला मारहाण
By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:46+5:302014-12-19T22:56:46+5:30
शाळेत गैरहजर असलेल्या दिवसांचा पगार काढला नाही या कारणावरुन संतप्त होवून तळा तालुक्यातील आंबेळी आदिवासीवाडी येथील

महिला गटशिक्षणाधिका-याला मारहाण
अलिबाग : शाळेत गैरहजर असलेल्या दिवसांचा पगार काढला नाही या कारणावरुन संतप्त होवून तळा तालुक्यातील आंबेळी आदिवासीवाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेचा शिक्षक संतोष बापू वाळके याने तळा तालुका पंचायत समितीच्या कार्यालयात गोंधळ घातला. यावेळी तेथे सरकारी काम करणाऱ्या तळा तालुक्याच्या प्रभारी महिला गटशिक्षणाधिकारी सुरेखा मारुती तांबट यांना भर कार्यालयातच अर्वाच्च शिवीगाळ गेली. यावेळी हाताबुक्क्यांनी मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्न करत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. वाळके यांना तळा पोलिसांनी अटक केली आहे.
शिरुर येथील संतोष वाळके हा तळा तालुक्यातील आदिवासीवाडी येथील रायगड जि.प.प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याची माहिती तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस.मुंढे यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)