Join us

शस्त्राचा धाक दाखवून महिलेला विनयभंग, पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 23:30 IST

२ मार्च रोजी वीणा त्यांच्या मैत्रिणीसह नव्या फ्लॅटवर गेल्या तेव्हा त्यांच्या घरात पटेल नावाचे कुटुंब भाडेतत्त्वावर राहत असल्याचे त्यांना समजले.

मुंबई : फ्लॅटच्या वादात एका महिलेला चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ करून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार बोरीवलीत मंगळवारी घडला. या प्रकरणी पोलिसांनी नीलेश आंब्रिया नावाच्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.पीडित महिला वाणी (नावात बदल) या त्यांच्या पती आणि मुलासोबत दहिसर परिसरात राहतात. ऑगस्ट, २०१८ मध्ये ८६ लाख रुपयांमध्ये आंब्रियाकडून वाणी यांच्या पतीने फ्लॅट विकत घेतला. त्याचे स्टॅम्प ड्युटी वगळता सर्व पैसेही आंब्रियाला देण्यात आले आणि फ्लॅटची चावी वीणा यांच्याकडे होती. मात्र २ मार्च रोजी वीणा त्यांच्या मैत्रिणीसह नव्या फ्लॅटवर गेल्या तेव्हा त्यांच्या घरात पटेल नावाचे कुटुंब भाडेतत्त्वावर राहत असल्याचे त्यांना समजले.त्याचवेळी आंब्रिया त्या ठिकाणी आला. वीणा यांनी घराबाबत त्याला जाब विचारला तेव्हा त्याने वाणी यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच याची तक्रार पोलिसांना केल्यास त्यांना चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीही दिली, असा त्यांचा आरोप आहे. त्यानुसार या प्रकरणी त्यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.