बंदुकीचा धाक दाखवत महागडा मोबाइल हिसकावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:36 IST2021-02-05T04:36:48+5:302021-02-05T04:36:48+5:30
- ओशिवरा पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवत महागडा मोबाइल हिसकवणाऱ्या आरोपीला अवघ्या बारा तासांत ...

बंदुकीचा धाक दाखवत महागडा मोबाइल हिसकावला
- ओशिवरा पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवत महागडा मोबाइल हिसकवणाऱ्या आरोपीला अवघ्या बारा तासांत गजाआड करण्यात आले. शुक्रवारी ही कारवाई ओशिवरा पोलिसांनी केली.
दानिश जमील खान (२३) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. अंधेरी पश्चिमच्या ट्विंकल अपार्टमेंटमध्ये २८ जानेवारी, २०२१ रोजी खान याने दुकानदार जगदीश जेतू यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून जवळपास ८६ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावत पळ काढला. याप्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम आणि पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत यांनी तांत्रिक तपास करत खानच्या अंधेरी परिसरातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ७५ हजारांची रोख तसेच गुन्ह्यासाठी त्याने वापरलेली दुचाकीदेखील हस्तगत करण्यात आली आहे.