Join us  

उल्हासनगरात वडिलांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार,वडिलाला पोलीस कस्टडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 1:17 PM

(सदानंद नाईक) उल्हासनगर : शहरातील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याचाही धमकी देऊन, वडीलाने अत्याचार केल्याची घटना उघड ...

(सदानंद नाईक) उल्हासनगर : शहरातील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याचाही धमकी देऊन, वडीलाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने ६ ऑक्टोबर पर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी सुनावली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर परिसरात १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी आई-वडील व भावासोबत राहून शिक्षण घेत होती. मुलीची आई मुंबई येथे खाजगी घरगुती कामाला असून ती महिन्यातून कधीतरी मुलांना व नवऱ्याला भेटायला येते. असे पोलिसांनी सांगितले. १ मे २०२१ ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान नशेच्या आहारी गेलेला वडील घरात कोणी नसतांना अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे करीत होता. मात्र २० ऑगस्ट रोजी नशेत आलेल्या वडिलांनी मुलीला जिवेठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. सदर प्रकार आईसह कोणाला सांगितल्यास आई व मुलीला जिवेठार मारण्याची धमकी दिली.

प्रचंड घाबरलेल्या मुलीला नैराश्य येऊन ती वडीलाने केलेल्या अत्याचाराचे स्टेटस मोबाईलवर ठेवू लागली. मुलीच्या वागण्याने व मोबाईल स्टेटसवरून आईला संशय आला. आईने मुलीला विश्वासात घेवून चौकशी केल्यावर, रविवारी २ ऑक्टोबर रोजी मुलीने आई सोबत जाऊन वडिला विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल झाला.

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे तपास करीत आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने ३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली. पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई