मिनीबससाठी उपोषण

By Admin | Updated: November 10, 2014 22:19 IST2014-11-10T22:19:51+5:302014-11-10T22:19:51+5:30

शासनाच्या परिवहन विभागाने 2क्क्8 साली कर्जत- नेरळ - माथेरान अशी मिनी बससेवा सुरु केली.

Fasting for the minibus | मिनीबससाठी उपोषण

मिनीबससाठी उपोषण

कर्जत : शासनाच्या परिवहन विभागाने 2क्क्8 साली कर्जत- नेरळ - माथेरान अशी मिनी बससेवा सुरु  केली.  मात्न त्या दिवसापासून माथेरानला जाणारी मिनीबस काहीना काही कारणाने गाजतच आहे. ही बस सेवा नादुरुस्त, अनियमित असल्याने वर्षभर माथेरानमधील विद्याथ्र्याना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माथेरानमधील विद्याथ्र्यानी सोमवार 1क् नोव्हेंबरपासून कर्जत येथील एसटी आगारासमोर उपोषण सुरु  केले आहे. जोर्पयत माथेरानसाठी नवीन मिनीबस येत नाही तोर्पयत उपोषण सुरु च ठेवणार असा पवित्ना उपोषणकत्र्या विद्याथ्र्यानी घेतला आहे.
माथेरानमधील मुलांना माथेरान बाहेर शिक्षणाला जाणो वाहतुकीच्या दृष्टीने परवडत नव्हते, 2क्क्8मध्ये माथेरानसाठी शासनाने मिनीबससेवा सुरु  केली. मात्न माथेरान घाट रस्त्यावर या गाडय़ा काही चालल्या नाही. मिनीबस सेवा बंद पडली तर त्याचा परिणाम प्रवाशांवर कमी प्रमाणात होतो. मात्न विद्याथ्र्याना याचा मोठा परिणाम भोगावा लागत आहे. मिनीबसच्या अनियमिततेबाबत माथेरानमधील अकरावी, बारावी व उच्च शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याचे मोठे नुकसान होत आहे. माथेरानचे उपनगराध्यक्ष राजेश दळवी व नगरसेवक दिनेश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील एसटी आगाराच्या समोर आज सकाळीपासून उपोषण सुरु  केले आहे. जोर्पयत माथेरानसाठी नवीन मिनीबस येत नाही तोपयर्र्त उपोषण मागे घेणार नाही असा निर्णय घेतला आहे.
सकाळी आमदार सुरेश लाड यांनी उपोषणकत्र्या विद्याथ्र्यांची भेट घेतली. या ठिकाणी उपस्थित असलेले कर्जत आगाराचे प्रमुख अविनाश कचरे यांची आमदार लाड यांनी चांगलीच कान उघडणी केली आणि तातडीने माथेरानसाठी मिनीबस द्या, अशी  सूचना केली. जोर्पयत नवीन गाडय़ा येत नाहीत तोर्पयत हे विद्यार्थी उपोषण करतील असे सांगून नाहीतर मीच उद्यापासून तुमच्या कार्यालयासमोर उपोषणास बसेन असा इशारा दिला.
 
1माथेरान घाट रस्त्यावर काही गाडय़ा सुरू करण्यात आल्या होत्या मात्र त्या घाटरस्त्यावर चालल्या नाही. मिनीबस सेवा बंद पडली तर त्याचा परिणाम प्रवाशांबरोबरच माथेरानच्या विद्याथ्र्यावर होतो. मिनीबसच्या अनियमिततेबाबत माथेरानमधील अकरावी, बारावी व उच्च शिक्षण घेणा:या विद्याथ्र्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. 
 
2घाटमाथ्यावरील रस्त्यात बस बंद पडण्याच्या घटना आतार्पयत अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त खर्चाचा भरुदड सहन करावा लागतो. शिवाय नाहक वेळ वाया जातो. त्यामुळे विद्याथ्र्याच्या सोयीसाठी माथेरानमध्ये वाहतुकीबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहे. 
 
3विद्याथ्र्यासोबत माथेरानच्या नगराध्यक्षा दिव्या डोईफोडे, कर्जतचे नगराध्यक्ष राजेश लाड, उपनगराध्यक्ष लालधारी पाल, विद्यार्था प्रवासी संघटना अध्यक्षा मिताली धनवडे, माजी उपनगराध्यक्ष विवेक चौधरी, हिरावती सकपाळ, सुनिता आखाडे, चंद्रकांत जाधव, सुहासिनी शिंदे आदींनी पाठिंबा दर्शवला. तसेच याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
 

 

Web Title: Fasting for the minibus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.