जलद लोकलची दिरंगाई २ वर्षे कायम

By Admin | Updated: November 24, 2015 02:10 IST2015-11-24T02:10:24+5:302015-11-24T02:10:24+5:30

ठाणे ते दिवा या पाचव्या-सहाव्या नवीन मार्गाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर २0१७ साल उजाडणार आहे. काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष जरी लेटमार्क लागणार असला तरी त्यामुळे जलद लोकलची दिरंगाई टळेल

Fast locals were delayed for two years | जलद लोकलची दिरंगाई २ वर्षे कायम

जलद लोकलची दिरंगाई २ वर्षे कायम

मुंबई : ठाणे ते दिवा या पाचव्या-सहाव्या नवीन मार्गाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर २0१७ साल उजाडणार आहे. काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष जरी लेटमार्क लागणार असला तरी त्यामुळे जलद लोकलची दिरंगाई टळेल, असा विश्वास एमआरव्हीसीतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांना दिलासाही मिळेल.
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर कुर्ला ते ठाणेपर्यंत आणि त्यानंतर थेट दिवा ते कल्याणपर्यंत पाचवा-सहावा मार्ग उपलब्ध आहे. तर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गावर काम सुरू आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास थेट कुर्ला ते कल्याणपर्यंत पाचवा-सहावा मार्ग उपलब्ध होईल आणि या मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांना सरळ मार्ग मिळेल. मात्र त्यासाठी डिसेंबर २0१७ पर्यंत मध्य रेल्वे प्रवाशांना वाट पाहावी लागेल. एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी-२ ला २00८-0९ मध्ये मंजुरी मिळाली होती. यात ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचा समावेश होता.
मंजुरी मिळाल्यानंतर ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रकल्पाची किंमत ही जवळपास १३३ कोटी होती. या प्रकल्पाच्या कामाला साधारपणे २0१३ मध्ये सुरुवात करण्यात आली आणि प्रकल्प २0१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आता ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाला आणखी एक वर्ष
जास्त लागणार असल्याचे एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात
आले आहे.
हा मार्ग पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २0१७ ची अंतिम मुदत ठरविण्यात आली असून त्यादृष्टीने काम पूर्ण करण्यावर भर देत आहोत. प्रकल्पाच्या मंजूर रकमेत मध्यंतरी काही कारणास्तव वाढ होऊन ती २00 कोटींपर्यंत गेली होती. आता प्रकल्पाला एक वर्ष लेटमार्क लागणार असल्याने यात आणखी ९0 कोटींची भर पडली आहे
काही ठिकाणी असलेली जागेची आवश्यकता, मोठ्या प्रमाणात असलेली अनधिकृत बांधकामे आणि दोन बोगद्यांची कामे यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास थोडा वेळ लागत असल्याचे या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. प्रकल्प पूर्ण झाल्यास कुर्ला ते कल्याणपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांना पाचवा-सहावा थेट मार्ग उपलब्ध होईल आणि त्यामुळे लोकल गाड्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे होणारा लेटमार्क टळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
१सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्गही एमयूटीपी-२ अंतर्गत बनविला जाणार आहे. मात्र या मार्गावर ट्रॅकजवळ असणारी मोठ्या प्रमाणात बांधकामे आणि फारशी उपलब्ध नसलेली जागा यामुळे हा मार्ग बनण्यात अडचणी येत आहेत. तरीही रेल्वेकडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग बनल्यास सीएसटीपासून कल्याणपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी सरळ मार्ग मिळेल आणि जलद लोकल गाड्यांच्या वक्तशीरपणात चांगलीच सुधारणा होईल, असे अधिकारी सांगतात.

Web Title: Fast locals were delayed for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.