गच्चीवर फास्टफूड स्टॉल, अन्न शिजविण्यास मनाई

By Admin | Updated: December 21, 2014 02:05 IST2014-12-21T02:05:51+5:302014-12-21T02:05:51+5:30

मुंबईत गच्चीवर रेस्टॉरंटला परवाना देण्याचा मसुदा अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे़

Fast food stall on the terrace, prohibition of cooking food | गच्चीवर फास्टफूड स्टॉल, अन्न शिजविण्यास मनाई

गच्चीवर फास्टफूड स्टॉल, अन्न शिजविण्यास मनाई

मुंबई : मुंबईत गच्चीवर रेस्टॉरंटला परवाना देण्याचा मसुदा अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे़ मात्र गच्चीवर अन्न शिजविणे, फास्ट फूड स्टॉल, आइसक्रीम पार्लर्स, पानबिडीचे गाळे यास मनाई करण्यात आली आहे़ तसेच मद्यपान पुरविण्यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असणार आहे़ या अटींचे उल्लंघन केल्यास तत्काळ परवाना रद्द करण्यात येणार आहे़
मुंबईत समुद्राच्या दिशेने असलेल्या इमारतींच्या गच्चीवर रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी मिळण्याची मागणी हॉटेलमालकांच्या असोसिएशनकडून होत होती़ अशी परवानगी देण्याआधी धोरण तयार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला़ त्यानुसार २३ अटींचा समावेश असलेल्या धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे़ मात्र एकाच आस्थापनाची इमारत असलेल्या गच्चीवर अशा रेस्टॉरंटला परवानगी देण्यात येणार आहे़ तसेच गच्चीवर छत टाकू नये, शौचालय बांधू नये, या रेस्टॉरंटबाबत आसपाच्या इमारतींकडून तक्रारी येऊ नयेत़ तसेच पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या महत्त्वाच्या अटींचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)

परवानगी कोणाला?
वापरण्याजोगे चटईक्षेत्र निर्देशांक शिल्लक नसलेल्या व इमारतीच्या गच्चीवरील मोकळी जागा चटईक्षेत्र निर्देशांकात न पकडलेल्या एकाच आस्थापनाखाली असणाऱ्या उपाहारगृह इमारतीच्या गच्चीवर अशा रेस्टॉरंटला परवानगी देण्यात येईल.

अर्ज कोणाकडे करावा?
कार्यकारी आरोग्य अधिकारी अथवा विभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा़ त्यानुसार अटी मान्य करणाऱ्या अर्जदारांनी छाननी, परवाना व अनामत शुल्क भरल्यानंतर परवाना देण्यात येईल़

च्गच्चीवर अन्न शिजविण्याची परवानगी नाही़ त्यामुळे खाद्य पदार्थ इंडक्शन किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करून ग्राहकांना द्यावे तसेच फास्ट फूड, आइसक्रीम पार्लर्स, पानबिडीचे गाळे उभारण्यास मनाई करण्यात आली आहे़
च्गच्चीचा वापर मोकळ्या आकाशाखाली असावा़ म्हणजेच छत बांधण्यात येऊ नये़ पावसाळ्यात शेड उभारण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्यात यावी़
च्या रेस्टॉरंटची वेळ पोलीस आणि पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने निश्चित केलेल्या नियमानुसार असेल़
च्पूर्ण वर्षाचे शुल्क एप्रिल महिन्याच्या १ तारखेपूर्वी वसूल करण्यात येईल़
च्पुरातन वास्तू असल्यास गच्चीवर दिवाबत्ती लावण्यापूर्वी मुंबईत पुरातन वास्तू जतन समितीची पूर्वपरवानगी व विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे़
च्कोणतेही होर्डिंग्ज किंवा निआॅन दिवे बसविण्यापूर्वी पालिकेच्या परवाना विभागाची परवानगी घ्यावी़
च्गच्चीवरील भिंतीची उंची वाढविणे, बदल घडविण्याची परवानगी इमारत प्रस्ताव विभागाकडून घ्यावी लागेल़

च्मुंबईत आठशे ठिकाणी गच्चीवर रेस्टॉरंट चालविली जात आहेत़ त्यांच्यावर पालिकेने अनेक वेळा कारवाई केली, परंतु अशी रेस्टॉरंट्स तरीही अनेक ठिकाणी सुरूच असून, यात पालिकेचा महसूल बुडतो आहे़
च्त्यामुळे गच्चीवर रेस्टॉरंटला परवानगी देण्याची मागणी हॉटेल मालकांकडून पुढे आली होती़ नोव्हेंबर २०१२ मध्ये ही मागण्या मान्य करीत प्रशासनाने धोरण तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या़

Web Title: Fast food stall on the terrace, prohibition of cooking food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.