Join us
Daily Top 2Weekly Top 5

फॅशन डिझायनरची आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 02:59 IST

इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून पडून एका फॅशन डिझायनर महिलेचा मृत्यू झाला. ओशिवरा परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.

मुंबई : इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून पडून एका फॅशन डिझायनर महिलेचा मृत्यू झाला. ओशिवरा परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणी चौकशी करीत आहेत.विनीता लुथरिया (४०) असे या मृत महिलेचे नाव आहे. व्यवसायाने त्या ज्वेलरी डिझायनर असून वर्सोवा परिसरात राहत होत्या. अंधेरी पश्चिममध्ये विरा देसाई रोड परिसरात सोरेंटो हा चोवीस मजली टॉवर आहे. या ठिकाणी असलेल्या चौथ्या मजल्यावरील पार्किंगमध्ये दुपारी १ च्या सुमारास रक्तबंबाळ अवस्थेत त्या सापडल्या. याची माहिती स्थानिकांकडून ओशिवरा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.चौथ्या मजल्यावरून जखमी लुथरिया यांना खाली उतरवत तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लुथरिया या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर क्लाइंटला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी पैशावरून त्यांच्यात काही वाद झाले. त्यानंतर त्या तेविसाव्या मजल्यावर गेल्या आणि ही दुर्घटना घडली. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्या नेमक्या कोणाला भेटण्यासाठी आल्या होत्या. तसेच त्या खाली कशा कोसळल्या याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.