शेतकऱ्यांना आधार ‘जलयुक्त’चा
By Admin | Updated: July 16, 2015 22:52 IST2015-07-16T22:52:09+5:302015-07-16T22:52:09+5:30
पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जमिनीत मुरून राहण्यासाठी बांधलेले बंधारे काही प्रमाणात त्या त्या भागातील

शेतकऱ्यांना आधार ‘जलयुक्त’चा
नेरळ : पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जमिनीत मुरून राहण्यासाठी बांधलेले बंधारे काही प्रमाणात त्या त्या भागातील शेतकरीवर्गासाठी मदतगार ठरत आहेत. जलयुक्त शिवारअंतर्गत खोदलेले मातीचे बंधारे यांचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक ठिकाणी शेतीची कामे उरकली जात आहेत.
कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवारसाठी तीन गावे निवडण्यात आली होती.त्यात पाच वर्षांमध्ये
जामरुंग या टेंबरे ग्रामपंचायतच्या गावामध्ये पावणेतीन कोटी खर्च करून हा परिसर पाण्याच्या दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न कृषी, पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे, महसूल, वन या विभागांच्या मदतीने केला जाणार आहे. उन्हाळ्यात या परिसरात पाणीटंचाई असते. ओलमण या दुसऱ्या गावामध्ये दोन कोटी पस्तीस लाख रु पये खर्च करण्यात येणार असून त्या गावामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवते. तर राजनाला कालव्याच्या भागात असून देखील मांडवणे या गावाच्या शिवारात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. म्हणून हा परिसर पाणीदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न जलयुक्त शिवारअंतर्गत केला जात आहे. मांडवणेत आतापर्यंत आठ मातीचे बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. तर जामरु ंगमध्ये नऊ ठिकाणी मातीचे बंधारे खोदण्यात आले असून डोंगर भागात पाणी अडवून जमिनीची भूजल क्षमता वाढविण्यासाठी डोंगररांगांमध्ये लूज बोर्डर बनविण्यात आले आहेत. ओलमण भागामध्ये वनविभागाने ३००० जलशोधक खंदक खोदून जमिनीची भूजल क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत भूसंधारण आणि जलसंधारण अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा फायदा जामरु ंग, मांडवणे आणि ओलमणमधील शेतकऱ्यांना होत आहे. सध्या पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असताना जलयुक्त शिवारअंतर्गत कामे सुरू असलेल्या गावांमध्ये शेतीची कामे करताना शेतकरी दिसत आहे. ज्या ठिकाणी मातीचे बांध खोदण्यात आले आहेत, तेथे भाताची रोपे आजही हिरवीगार आहेत. तालुक्यातील अन्य भागात मात्र भाताची रोपे सुकून गेल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
जलयुक्त शिवारने आमच्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचवेळी गावाच्या शिवारातील जमिनीच्या भूजल पातळीमध्ये वाढ होण्यासाठी देखील मदतीचा ठरू शकला आहे.
-अरु ण भोईर, माजी सरपंच, मांडवणे
ओलमण गावाचा सर्व भाग टेकड्या आणि खोलगट आहे. त्यामुळे सध्या वनविभाग खोदत असलेले जलखंदक हे आमच्या भागातील पाण्याची भूजल क्षमता वाढविण्यासाठी मदतगार ठरत आहेत.
-दादा पादिर, माजी सरपंच, ओलमण