दमदार पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला

By Admin | Updated: June 15, 2015 23:38 IST2015-06-15T23:38:50+5:302015-06-15T23:38:50+5:30

चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वसई विरार पूर्व भागातील शेतीच्या कामाना वेग आला आहे. नांगरणीची कामे करण्यात

The farmers of the district have dried up the mighty rain | दमदार पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला

दमदार पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला

वसई : चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वसई विरार पूर्व भागातील शेतीच्या कामाना वेग आला आहे. नांगरणीची कामे करण्यात शेतकरी गुंतला असून लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, कृषी केंद्रामध्ये बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
वसई विरार पूर्व भागात मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड केली जाते. पावसाने सध्या दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील काही वर्षात पावसाने वेळेवर हजेरी लावली परंतु त्यानंतर दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. पावसाने साथ दिल्यास यावर्षी भरघोस उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

जव्हारमध्ये गारवा : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेल्या जव्हारमध्ये पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढते. जव्हार शहर हे समुद्रसपाटी पासून २००० फूट उंचीवर असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. पावसाळा सुरू झाल्यामुळे गारवा निर्माण झाला.

Web Title: The farmers of the district have dried up the mighty rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.