गॅस पाइपलाइन विरोधात शेतकरी

By Admin | Updated: March 31, 2015 22:24 IST2015-03-31T22:24:05+5:302015-03-31T22:24:05+5:30

रिलायन्स कंपनीची गॅस वाहिनी खालापूर तालुक्यातून जाणार असल्याने त्या संदर्भात येत्या ४ एप्रिलला प्रशासनाकडून जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे

Farmer against gas pipeline | गॅस पाइपलाइन विरोधात शेतकरी

गॅस पाइपलाइन विरोधात शेतकरी

खालापूर : रिलायन्स कंपनीची गॅस वाहिनी खालापूर तालुक्यातून जाणार असल्याने त्या संदर्भात येत्या ४ एप्रिलला प्रशासनाकडून जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या पाइपलाइनमुळे शेतीचे नुकसान होणार असल्याने शेतकरी आणि कंपनी यांचा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
यापूर्वी एचपी कंपनीची उरण ते शिक्र ापूर या मार्गासाठी जाणाऱ्या गॅस पाइपलाइनमुळे रसायनी, वाशिवली, लोहोप, माडप, माजगावमधील शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हा लढा सुरू असतानाच वावोशी भागातून शेतकऱ्यांच्या शेतातूनच ही पाइपलाइन जाणार असल्याने शेतकरी विरु द्ध रिलायन्स असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे.
काही वर्षांपूर्वी गेल कंपनीच्या गॅस पाइपलाइनसाठी खालापूर तालुक्यात मोठा संघर्ष उभा राहिला होता. त्यानंतर नारंगी एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळण्यासाठी लढा सुरू केला असतानाच तालुक्याच्या माजगाव भागातूनही हिंदुस्थान पेट्रोकेमिकल कंपनीची लाइन शेतीमधून गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतजमिनीच्या मोबदल्यापासून बांधबंदिस्तीसाठी अनेकदा शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न केला, मात्र आजही एचपी कंपनीविरोधात शेतकरी असा असंतोष कायम राहिला आहे. आता वावोशी, गोरठण आदी गावांमधून ही पाइपलाइन जाणार असल्याने त्यासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणी येत्या ४ एप्रिलला धामणी येथील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी ११ वाजता होणार असून या बैठकीसाठी ग्रामसेवकांनी नोटिसा दिल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Farmer against gas pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.