फराह खानच्या तिळ्यांचे यश

By Admin | Updated: December 6, 2014 23:35 IST2014-12-06T23:35:23+5:302014-12-06T23:35:23+5:30

चित्रपट दिग्दर्शक फराह खानच्या तिळ्यांनी मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या वतीने आयोजित ज्युदो स्पर्धेत पदकांची लयलूट करत स्पर्धा गाजवली.

Farah Khan's triplets success | फराह खानच्या तिळ्यांचे यश

फराह खानच्या तिळ्यांचे यश

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक फराह खानच्या तिळ्यांनी मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या वतीने आयोजित ज्युदो स्पर्धेत पदकांची लयलूट करत स्पर्धा गाजवली. जार, अन्या आणि दिव्या कुंदर या त्रयीने आपापल्या गटात अनुक्रमे सुवर्ण व प्रत्येकी एक रौप्य पटकावताना सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
धारावी येथील क्रीडा संकुलामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत धिरुभाई अंबानी स्कूलच्या या त्रयीने आपला दबदबा राखला. जार कुंदरने मुलांच्या गटामध्ये बॉम्बे स्कॉटिशच्या ध्रुव शिराली याचा ओ-सोटो-गारी थ्रो करीत इप्पोन मिळवत सुवर्ण मिळवले.
यानंतर मुलींच्या गटात अन्या कुंदरला अंतिम फेरीत एल.डी. डोशी गुरुकुल शाळेच्या (घाटकोपर) शुभ्रा खामकर विरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. शुभ्राने ओसायकुमी वाझा पक्ड करताना सहजपणो बाजी मारली. त्याचवेळी दिव्या कुंदरलादेखील मुलींच्या गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
अलेक्ङोंड्रा शाळेच्या अन्या पितळे हिने अप्रतिम पकड करीत तब्बल 25 मिनिटे दिव्याला पकडून ठेवत सुवर्ण पदकावर कब्जा केला. अन्य लढतीत 14 वर्षाखालील मुख्य गटात आय.ई.एस. मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय खेळाडू अथश्री देशमुखने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना जे. बी. वच्छाच्या शांभवी कदमला सहज लोळवताना सुवर्ण मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)

 

Web Title: Farah Khan's triplets success