मुंबई - विलेपार्ले स्थानकात होमगार्ड आणि मोटरमनच्या वादानंतर काहीजणांकडून होमगार्डच्या जवानांची कोंडी होत असल्याबाबत ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल घेत तेथे बंद झालेले पंखे पुन्हा सुरू झाले आहे, तर सीएसएमटी तसेच चर्चगेट स्थानकात मोटरमनच्या केबिनमध्येही पाण्यासाठी त्यांना पुन्हा पाहिल्यासारखी एंट्री मिळाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
२१ एप्रिल रोजी विलेपार्ले स्थानकात होमगार्ड आणि मोटरमनच्या वादात होमगार्ड मनोज सावंतने मोटरमनला लाथ मारली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी एनसी दाखल करण्यात आली. मात्र, या प्रकरणात संबंधितावर गुन्हा नोंदवत कडक कारवाईची मागणी होत आहे. मात्र, या घटनेनंतर त्या दोघांमधील वादाने होमगार्डच्या सर्वच कर्मचाऱ्यांना टार्गेट करत असल्याचा सूर होमगार्डकडून सुरू झाला.
शनिवारी रात्री शेवटची लोकल गेल्यानंतर होमगार्डचे जवान वांद्रे स्थानकातील तिकीट काउंटरच्या आवारात काही तास आरामासाठी आले. तेव्हा, पंखे बंद करण्यात आले. अनेकदा विनवणी करूनही कोणीही दखल न घेतल्याने त्यांना विनापंख्याचे झोपावे लागले होते. दुसरीकडे, सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोटरमनच्या केबिनमध्ये थंड पाण्याची व्यवस्था आहे. यापूर्वी स्थानकावर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस तेथूनच पिण्यासाठी पाणी भरायचे. मात्र, या घटनेनंतर तेथेही त्यांची अडवणूक सुरू असल्याचा आरोप जवानांकडून झाला. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी होमगार्डचे जवान पाणी घेण्यासाठी केबिनमध्ये गेले तेव्हा तेथे त्यांना कुणीही अटकाव केला नाही. तसेच बंद पंखेही पुन्हा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
Web Summary : After a Lokmat report highlighting difficulties faced by home guards following a motor-man dispute, fans were restarted, and water access in motor-men's cabins was restored at CSMT and Churchgate stations, bringing relief.
Web Summary : मोटरमैन विवाद के बाद होम गार्डों को हो रही कठिनाइयों पर लोकमत की रिपोर्ट के बाद, पंखे फिर से शुरू किए गए, और सीएसएमटी और चर्चगेट स्टेशनों पर मोटरमैन के केबिनों में पानी की पहुँच बहाल कर दी गई, जिससे राहत मिली।