Join us  

अमिताभ बच्चन यांना भारतरत्न देण्याची चाहत्यांची मागणी, #BharatRatnaForBACHCHAN ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 8:46 PM

 बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भारतरत्न सन्मान द्यावा, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

मुंबई -  बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भारतरत्न सन्मान द्यावा, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांना भारत रत्न देण्याची मागणी करणारा  #BharatRatnaForBACHCHAN हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या हॅशटॅगचा वापर करून चाहते विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.   बिग बी, शहेनशाह, अॅँग्री यंग मॅन अशा विविध नावांनी बॉलिवडूमध्ये नाव कमावलं. स्ट्रगल करून स्वत:च्या हिंमतीवर एवढी मजल मारणारे अमिताभ बच्चन सगळ्याच नवकलाकारांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहेत. गेल्या ३ दशकात त्यांनी रसिक प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने खिळवून ठेवलंय. १८० हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं असून काही चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायक आणि निर्मितीचेही काम केले आहे. ऐन तारुण्यात कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिग बींनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच आपले चाहते बनवले आहे. 

 

टॅग्स :अमिताभ बच्चनबातम्याकरमणूकट्विटर