बनावट नोटांचा ताप

By Admin | Updated: April 15, 2015 00:19 IST2015-04-15T00:19:40+5:302015-04-15T00:19:40+5:30

भारतीय चलनाच्या बनावट नोटांचे प्रमाण इतके आहे की पाचशे - हजारांच्या नोटा घेताना त्या असलीच आहेत की नाही याची खातरजमा होईपर्यंत सारे जण अस्वस्थ असतात.

False notes of fake notes | बनावट नोटांचा ताप

बनावट नोटांचा ताप

भारतीय चलनाच्या बनावट नोटांचे प्रमाण इतके आहे की पाचशे - हजारांच्या नोटा घेताना त्या असलीच आहेत की नाही याची खातरजमा होईपर्यंत सारे जण अस्वस्थ असतात. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे सात लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या बनावट नोटा इतक्या हुबेहूब आहेत, की त्यातून नेमकी खरी नोट हुडकून काढणे अवघड होते.
या बनावट नोटा किरकोळ दुकानांसह मोठ्या बाजारपेठांमध्ये चलनात आणण्याचा प्रयत्न होत असतो. नवी मुंबईची एपीएमसी बाजारपेठ ही देखील त्यासाठी एक केंद्रस्थान आहे. एपीएमसीमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. तेथे होत असलेल्या रोखीच्या व्यवहाराचा गैरफायदा घेत बनावट नोटा चलनात आणल्या जातात. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे.
निवडणूक काळातही मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्या जातात. लोकसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी एका इसमाला तीन लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली होती. त्याच बांगलादेशी व्यक्तीला काही दिवसांपूर्वी ऐन पालिका निवडणूक काळातही पुन्हा बनावट नोटांसह अटक करण्यात आली. मात्र आपल्याकडे बनावट नोटा आल्या कुठून, त्या
आपण कोणाला देणार होता याची माहिती त्याने पोलिसांना दिलेली
नाही. बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली असली तरी या नोटांचे कनेक्शन थेट पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळशी असल्याने त्याच्या मुळापर्यंत जाणे पोलिसांना शक्य होत नाही. बहुतांश बनावट नोटा सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींमार्फत भारतात पाठवल्या जातात. परंतु नोटा वितरीत करणाऱ्या मूळ उगमस्थानाची कसलीही माहिती त्यांच्याकडे नसते. यामुळे मध्यस्थींना पकडल्यानंतरही सूत्रधाराचे पुरावे पोलिसांच्या हाती लागत नाहीत.
खऱ्या नोटांवरील गांधीजींचा वॉटरमार्क बनावट नोटांमध्येही हुबेहूब असतो. त्यामुळे नोटांमध्ये बसवलेल्या चांदीच्या पट्टीचा बदलता रंग हाच पर्याय त्याकरिता आहे. बनावट नोटांचे जाळे उखडून काढण्यासाठी राज्य पोलिसांसह केंद्रीय संस्थांकडून ठिकठिकाणी छापे टाकले जातात.
प्रतिवर्षी कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त केल्या जातात. तर दुसरीकडे भारतीय चलनाच्या खऱ्या व खोट्या नोटा ओळखायच्या कशा, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दरमहा पोलीस व बँक अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणह ठेवले जाते. मात्र असे प्रशिक्षित अधिकारीही संभ्रमात पडतील, अशा पद्धतीच्या बनावट नोटा बनवून त्या देशभर वितरीत केल्या जात आहेत.

च्या गुन्ह्यात स्थानिक टोळ्यांसह आंतरराष्ट्रीय टोळ्या सक्रिय आहेत. नोटांच्या रंगीत झेरॉक्स काढूनही बनावट नोटा तयार केल्या जातात. मात्र आंतरराष्ट्रीय टोळ्यांकडून बनवल्या जाणाऱ्या या नोटा ओळखण्यासाठी पोलिसांनाही बँक अधिकाऱ्यांकडून खात्री करावी लागत आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई

Web Title: False notes of fake notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.