नागोठणे १०८ क्रमांकाच्या रु ग्णवाहिका सेवेपासून वंचित

By Admin | Updated: June 20, 2015 23:36 IST2015-06-20T23:36:43+5:302015-06-20T23:36:43+5:30

मागील दोन वर्षांपासून शासनाच्यावतीने १०८ दूरध्वनी क्रमांकाद्वारे अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका जनतेसाठी राज्यातील सरकारी दवाखान्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

False deprivation of 108 services is denied to the ambulance service | नागोठणे १०८ क्रमांकाच्या रु ग्णवाहिका सेवेपासून वंचित

नागोठणे १०८ क्रमांकाच्या रु ग्णवाहिका सेवेपासून वंचित

नागोठणे : मागील दोन वर्षांपासून शासनाच्यावतीने १०८ दूरध्वनी क्रमांकाद्वारे अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका जनतेसाठी राज्यातील सरकारी दवाखान्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात रोहे ग्रामीण रुग्णालयासह पाली, कोलाड इतर प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा कार्यरतही करण्यात आली आहे. मात्र, नेहमी मुंबई - गोवा महामार्गावर अपघात होत असलेल्या नागोठणेला या सेवेपासून वंचित ठेवले असल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त होत आहे.
महामार्गावर नेहमी अपघात झाल्यानंतर अपघातातील जखमींना उपचार करण्यासाठी नागोठणे प्राथमिक केंद्रात आणले जाते. परंतु शहरात फक्त एक-दोनच रु ग्णवाहिका असल्याने अपघातात गंभीर जखमींची संख्या जास्त असल्यास पोलिसांना त्यांना नागोठणेत आणण्यासाठी आटापिटा करावा लागत असतो. संबंधित रुग्णवाहिका येथे उपलब्ध करून दिल्यास अपघातातील जखमी तसेच परिसरातील अत्यवस्थ रु ग्णांना त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याने ही गाडी येथे तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी नागोठणेत झालेल्या एका शासकीय बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. जी. वडजे यांच्यावतीने डॉ. नितीन नेटके यांनी तहसीलदार उर्मिला पाटील यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)

Web Title: False deprivation of 108 services is denied to the ambulance service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.