२५व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 06:05 IST2017-08-15T06:05:10+5:302017-08-15T06:05:12+5:30

गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधील ‘एकता ट्रायपॉंलीस’ इमारतीच्या पंचवीसाव्या मजल्यावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

Falling from the 25th floor, the youth dies | २५व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

२५व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

मुंबई : गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधील ‘एकता ट्रायपॉंलीस’ इमारतीच्या पंचवीसाव्या मजल्यावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी कंपनीच्या पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सलीम मकबूल शेख (२०) असे दुर्घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे.
सलीम हा या इमारतीमध्ये २५ व्या मजल्यावर मजुरीचे काम करत होता. या इमारतीत कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक जाळ्या तसेच अन्य सुरक्षेची उपकरणे नसल्याचे समजते.

Web Title: Falling from the 25th floor, the youth dies