Join us

इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:33 IST

मालाड पश्चिमच्या इजमिमा इमारतीवरुन पडून योगींदर सिंग (२२) नामक तरुणाचा मृत्यू झाला.

मुंबई : मालाड पश्चिमच्या इजमिमा इमारतीवरुन पडून योगींदर सिंग (२२) नामक तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. बेरोजगारीमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र हा घातपात असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला असून, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.सिंग सांताक्रूझ पूर्व परिसरात रहायचा. बुधवारी इजमीमा इमारतीत तो नोकरीसाठी आला होता. त्याला कोणी धक्का दिला, की तो स्वत: पडला याचा शोध पोलीस घेत आहेत.