बनावट वेबसाइटने नवोदितांची फसवणूक
By Admin | Updated: July 24, 2014 02:36 IST2014-07-24T02:36:37+5:302014-07-24T02:36:37+5:30
हिंदी चित्नपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या कंपनीच्या नावावर बनावट वेबसाइट तयार करून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बनावट वेबसाइटने नवोदितांची फसवणूक
मुंबई: हिंदी चित्नपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या कंपनीच्या नावावर बनावट वेबसाइट तयार करून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या वेबसाइटवरून नवीन कलाकारांना चित्नपटात काम करण्याची संधी असल्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक करण्यात येत होती. जूहू परिसरात राहणा:या एका तरुणीने याबाबत भन्साळी यांच्या कार्यालयात चौकशी केला असता सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भन्साळींच्या विकलाने जूहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला असता जुहू पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी फिल्म अँड प्रोडक्शन या कंपनीच्या नावाचा बनावट लोगो वापरून डुप्लिकेट वेबसाइट तयार करण्यात आली. भन्साळींच्या नावाने फसवणूक करीत असल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांच्या वकिलांनी जुहू पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दाखल केला़ याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
अशी झाली फसवणूक
वेबसाइटवर भन्साळींच्या चित्नपटात काम करण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. इच्छुकांनी कार्यालयात गर्दी किंवा फोन करू नय़े या वेबसाइटवर दिलेला फॉर्म फक्त भरावा़ तुम्हाला संपर्क केला जाईल, अशी सूचना दिली होती. या जाहिरातीवरून एक तरु णी भन्साळींच्या कार्यालयात पोचली व या जाहिरातीबाबत विचारणा केली़ त्या वेळी तेथील कर्मचारी वर्गाने अशी कोणतीही जाहिरात दिली नसल्याचे सांगितले.