नकली हि-यांत लपविला ‘खरा हिरा’, चिनी आरोपींनी केलेली चोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:33 IST2017-08-04T02:33:21+5:302017-08-04T02:33:23+5:30
गोरेगावच्या ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’मध्ये आणखी एका हिºयाची चोरी झाल्याची तक्रार बुधवारी वनराई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. हा हिरा शोधण्यात पोलिसांना गुरुवारी यश आले.

नकली हि-यांत लपविला ‘खरा हिरा’, चिनी आरोपींनी केलेली चोरी उघडकीस
मुंबई : गोरेगावच्या ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’मध्ये आणखी एका हिºयाची चोरी झाल्याची तक्रार बुधवारी वनराई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. हा हिरा शोधण्यात पोलिसांना गुरुवारी यश आले.
यापूर्वी चियांग चांगक्विंग (४७) आणि डेंग झियाबो (४५) यांनी एका छोट्या शॅम्पूच्या बाटलीत ३४ लाखांचा हिरा लपविला होता. दुभाषकाच्या मदतीने सात तास चौकशी करून पोलिसांनी हिरा हस्तगत केला. मात्र, त्यानंतर दुसºया हिºयाच्या चोरीची तक्रार पोलिसांना मिळाली. चोरांनी खरा हिरा त्यांच्याजवळ असलेल्या नकली हिºयासोबतच ठेवला होता. जेणेकरून तो सहजासहजी ओळखता येणार नाही. मात्र, संबंधित तक्रारदाराने लगेच तक्रार दाखल केल्याने हा हिरा पोलिसांना तातडीने हस्तगत करता आला.
हिºयाची चोरी झाल्याची तक्रार करणारे हिरे व्यापारी राजस्थानचे आहेत. गोरेगावमध्ये हिरे प्रदर्शनात ते सहभागी झाले होते. राजस्थानला पोहोचल्यावर त्यांच्याकडे असलेल्या हिºयातील एक हिरा नकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तपासाअंती पहिला हिरा चोरलेल्या आरोपींनीच हा हिरा चोरल्याचे उघडकीस आले. या दोन्ही चोरांच्या साहित्याची झडती घेतली असता, त्यांच्याकडे असलेल्या नकली हिºयांमध्येच असली हिरा मिळाला, तक्रारदाराने त्याचा हिरा ओळखला, अशी माहिती पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी दिली.