गाफील राहिल्यानेच शिवसेनेला अपयश

By Admin | Updated: October 25, 2014 23:53 IST2014-10-25T23:53:51+5:302014-10-25T23:53:51+5:30

लोकसभा निवडणुकितील यशानंतर शिवसेना नेतृत्वाने नवी मुंबईकडे दुर्लक्ष केले. शहरात एकही नेत्याची सभा झाली नाही.

Failure of the Shiv Sena due to deficiency | गाफील राहिल्यानेच शिवसेनेला अपयश

गाफील राहिल्यानेच शिवसेनेला अपयश

नामदेव मोरे - नवी मुंबई
लोकसभा निवडणुकितील यशानंतर शिवसेना नेतृत्वाने नवी मुंबईकडे दुर्लक्ष केले. शहरात एकही नेत्याची सभा झाली नाही. दोन्ही मतदार संघामधील प्रचारामध्ये सुसुत्रतेचा अभाव व गतवेळच्या चुका न टाळल्यामुळेअपयशास सामोरे जावे लागल्याचे बोलले जातआहे. 
 ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अनुक्रमे 2क्434 व 25784 मतांची आघाडी  मिळाली होती. गणोश नाईक यांच्या बालेकिल्यात मिळालेल्या आघाडीमुळे पक्षाच्या स्थानीक नेत्यांचा आत्मविश्वास वाढला होता. यावेळी दोन्ही मतदार संघामध्ये सेना भगवा फडकविणार असे वातावरण निर्माण झाले होते. भगवा सप्ताहाच्या निमीत्ताने वातावरण ढवळून काढण्यात आले. परंतु स्थानिक  नेत्यांच्या या प्रयत्नास पक्षाची तेवढी साथ मिळाली नाही. ऐरोली मतदार संघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत उमेदवारी निश्चीत झाली नाही. उमेदवारीवरून वैभव नाईक यांनी बंडखोरी करून भाजपाच्या तंबूत जाणो पसंत केल्याने सेना लढण्याअगोदरच बॅकफुटवर गेली. बेलापूरमध्ये उपनेते विजय नाहटा यांना उमेदवारी दिली. त्यांनी प्रचारामध्ये स्वत:ला झोकून दिले होते. परंतु एका शहरातच दोन्ही मतदार संघ असताना दोन्ही उमेदवार स्वतंत्रपणो प्रचार करत होते. समान कार्यक्रम घेत जनतेसमोर जाण्याचे टाळले. यामुळे प्रचारादरम्यान चौगुले एकटे पडल्याचे स्पष्टपणो दिसत होते. 
शहराच्या विकासाचा समान कार्यक्रम नसल्यामुळे शहरवासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याशिवाय भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही मतदार संघात प्रकल्पग्रस्तांना उमेदवारी दिली होती. सेनेने मात्र प्रकल्पग्रस्तांना स्थान दिले नाही.  त्याचाच फटका दिवाळे, शिरवण सारख्या गावात बसला व सेनेला पराभवास सामोरे जावे लागले. ऐरोली मतदार संघात गतवेळी कोपरखैरणो, खैरणो, बोनकोडे व तुर्भे परिसराने राष्ट्रवादीस मताधिक्य दिले होते. सेनेच्या नेत्यांनी पाच वर्षात पुन्हा या परिसराकडे दुर्लक्ष केल्याने यावेळीही फटका बसला आहे. 
 
खासदारांच्या निष्क्रीयतेचा फटका
च्लोकसभा  निवडणुकीनंतर खासदार राजन विचारे यांनी फक्त एकवेळ रेल्वे स्टेशनला भेट दिली होती. यानंतर खासदार शहरात फिरकलेच नाहीत. एकही काम मार्गी लावले नाही. 
च्कामाची छाप पाडण्यात त्यांना अपयश आले असून खासदार पूर्ण शहराचे आहेत की फक्त शिवसेनेचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासदारांच्या निष्क्रीयतेचा फटकाही या निवडणुकीत बसला आहे.
 
चिंतन बैठक मात्र एका व्यासपीठावर
च्निवडणुकीत दोन्ही मतदार संघात स्वतंत्रपणो प्रचार यंत्रणा राबविली गेली.  परंतु निवडणुकीनंतरची चिंतन बैठक मात्र युरो स्कूल समोरील मैदानात एकत्र घेण्यात आली. 
च्यावेळी पुन्हा नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु आता तरी पक्ष एकविचाराने काम करणार का व निष्क्रीय पदाधिका:यांचे काय करणार असा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करत आहे. 

 

Web Title: Failure of the Shiv Sena due to deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.