Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राणेंच्या पनवतीमुळे फडणवीस बुडाले', शिवसेना खासदाराचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 19:17 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ता सोडण्यात आली

मुंबई - राज्यातील राजकीय नाट्याचा आज द एन्ड झालाय, असे म्हणता येईल. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप पाहायला मिळाला. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 'आम्ही 162' म्हणत शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच आमदार उपस्थित होते. त्यानंतर, आज सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यासाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ता सोडण्यात आली असून आता शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आनंदात आहेत. तर, भाजपा नेत्यांवर आणि त्यांच्या प्रवक्त्यांवर टीकाही करण्यात येत आहे. शिवसेनाखासदार विनायक राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांना टार्गेट केलंय. नारायण राणेंच्या पनवतीने मा. देवेंद्र फडणवीस बुडाले असे ट्विट केलंय. तसेच, आता, नारायण राणेंनी गणिताचा अभ्यास करावा, असा सल्लाही राऊत यांनी दिलाय. 

सोशल मीडियावर नारायण राणेंबद्दल विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत. 

टॅग्स :शिवसेनामुंबईनारायण राणे विनायक राऊत खासदार