Join us  

पुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 7:56 PM

लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबूकची सेवा मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा ठप्प झाली.

मुंबई - लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबूकची सेवा मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा ठप्प झाली. फेसबुकची सेवा ठप्प होण्याची गेल्या तीन दिवसांमधील ही दुसरी वेळ आहे. फेसबूक डाऊन झाल्याने अॅपवर लॉगइन करता येत नव्हते. तसेच स्टेटस अपलोड करण्यामध्येही अडचणी येत होत्या. फेसबूक बंद झाल्याने त्रस्त झालेले नेटिझन्स ट्विटरवरून तक्रारी करत आहेत. दरम्यान, इन्स्टाग्रामही डाऊन झाले असून, इन्स्टाग्रामचे अकाऊंट उघडण्यातली अडचणी येत आहेत. दरम्यान, फेसबूकची सेवा रविवारी सकाळीसुद्धा ठप्प झाली होती. भारताबरोबरच जगभरात फेसबूकची सेवा बंद झाली असल्याने कोट्यवधी युझर्स त्रस्त झाले होते . फेसबूक बंद झाल्याने लॉगइन केल्यानंतर युझर्सना स्वत:ची प्रोफाइल दिसत होता मात्र न्यूज फिड बंद असल्याने इतरांच्या पोस्ट, फोटो दिसत नव्हते.  मात्र फेसबूकवर स्टेटस, तसेच फोटो अपलोड होत होते. दरम्यान, फेसबूक डाऊन झाल्यानंतर युझर्सनी ट्विटर तसेच अन्य सोशल मीडिया साइट्सवरून आपली तक्रार देण्यास सुरुवात केली.  अखेरीस भारतीय वेळेनुसार सकाळी 10.50 च्या सुमारास फेसबूकची सेवा पुन्हा सुरू झाली होती.रविवारी सकाळपासूनच अनेक युझर्सचे फेसबूकवरील न्यूजफि़ड पेज अपडेट होत नव्हते. तसेच डेक्सटॉपवर एरर मेसेज दिसत होता. फेसबूकवर लॉग इन केल्यावर समथिंग वेंट रॉग Something went wrong  आणि Try Refreshing This Page असा मेसेज दिसत होता.    

टॅग्स :फेसबुकआंतरराष्ट्रीय