मुंबई : फेसबुकवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एकाची ७.२० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्याचे विनोदसिंग राणा (५२) असे नाव असून, ते अंधेरीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये किचन मॅनेजर म्हणून काम करतात.
त्यांना फेसबुकवर अनिल सांघवी नावाच्या व्यक्तीने जादा नफ्याचे आमिष दाखवत शेअर मार्केटमध्ये ७.२० लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांना नफा होत असल्याचे ॲपमध्ये दिसले. त्यानंतर आयपीओसाठी अजून ९.४६ लाख भरण्यास सांगण्यात आले. मात्र, पैसे नसल्याने त्यांनी ती रक्कम भरली नाही.
मात्र, आयोपीओ अखेरपर्यंत लिस्टिंग न झाल्याने तक्रारदाराला संशय आला आणि गुंतवलेली रक्कम त्याने परत मागितली. मात्र, भामट्यांनी त्यांना पैसे परत करायला नकार दिला. तेव्हा तक्रारदाराने चौकशी केली असता, संबंधित नावाने कोणतीच कंपनी आणि ॲप अस्तित्वात नसल्याचे त्यांना समजले.