फेसबुकवरून धर्मगुरूची केली अवहेलना
By Admin | Updated: December 15, 2014 00:53 IST2014-12-15T00:53:21+5:302014-12-15T00:53:21+5:30
एका तरूणाच्या फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणारा मजूकर कुर्ला येथील तरूणाने टाकला होता. तो पाहून संतप्त समाजाने रात्री उशिरा पोलीस ठाण्यावर कुच करत

फेसबुकवरून धर्मगुरूची केली अवहेलना
मुंबई : एका तरूणाच्या फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणारा मजूकर कुर्ला येथील तरूणाने टाकला होता. तो पाहून संतप्त समाजाने रात्री उशिरा पोलीस ठाण्यावर कुच करत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. शिवडी येथील रफी अहमद किडवाई मार्ग पोेलिसांत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
यावेळी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अधिकची कुमक मागवून बंदोबस्त लावावा लागला. दरम्यान, गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात अपयश आल्याने शनिवारी दुपारी पुन्हा हे समाजबांधव पोलीस ठाण्यावर चालून गेले. (प्रतिनिधी)