Join us

विवाहबाह्य संबंध, पत्नीकडून मानसिक छळ; त्रासाला कंटाळून पोलिसाच्या मुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 06:01 IST

चुनाभट्टी पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि तिच्या मानसिक छळाला कंटाळून सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची घटना गुरुवारी उजेडात आली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा सिद्धेशचा २०२० मध्ये मानसीशी प्रेमविवाह झाला होता. मानसी मित्रांसोबत चॅटिंग करीत असल्याने लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडू लागले. याच त्रासाला कंटाळून १८ एप्रिल रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.   

गावातल्या घरी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यात, पत्नी मानसी मानसिक खच्चीकरण करत असल्याचे त्याने लिहिले होते. त्याच्या मोबाइलमध्ये आत्महत्येपूर्वी त्याने बनवलेला व्हिडीओ आढळला. त्यात त्याने, “पप्पा, माझी पत्नी मानसी रत्ने, तिचा मित्र युवराज जाधव आणि तिची मैत्रीण यांना सोडू नका. माझ्या मुलीचा ताबा फक्त माझ्या आई-वडिलांकडे द्या”, असे म्हटले आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराने मला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचेही त्यात त्याने म्हटले आहे, 

 

टॅग्स :मुंबई पोलीस