खंडणीखोर पत्रकार अमोल सुर्वे फरार

By Admin | Updated: September 14, 2014 01:23 IST2014-09-14T01:23:27+5:302014-09-14T01:23:27+5:30

शिधावापट केंद्र चालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भांडुप पोलीस खंडणीबहाद्दर अमोल सुर्वे याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सुर्वे अभिलेखावरील गुन्हेगार आहे.

The extortionist journalist Amol Survey absconded | खंडणीखोर पत्रकार अमोल सुर्वे फरार

खंडणीखोर पत्रकार अमोल सुर्वे फरार

मुंबई : शिधावापट केंद्र चालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भांडुप पोलीस खंडणीबहाद्दर अमोल सुर्वे याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सुर्वे अभिलेखावरील गुन्हेगार आहे. 
सुर्वे क्लब, शिधावाटप केंद्र, मसाज पार्लर, बांधकाम कंत्रटदारांपासून छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळतो.  मुलुंड पोलीस ठाण्यात दोन वर्षापूर्वी एका खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटकही झाल्याची माहिती तपास अधिकारी नितीन गिजे यांनी दिली. सुर्वेचा शोध घेत असून, त्याला शोधण्यासाठी पोलीस पथक कामाला लागले आहे. 
मुलुंडला राहणारे हितेश रामजी गणात्र यांचे भांडुपमध्ये साईप्रसाद जनरल स्टोअर्स नावाचे शिधावाटपाचे दुकान आहे. 8 सप्टेंबर रोजी अमोल सुर्वेने फोनवरून गणात्र यांना शिधावाटपातील काळाबाजाराची बातमी प्रसिद्ध करून परवाना रद्द करण्याची धमकी दिली होती. असे न करण्यासाठी पेपरला आर्थिक हातभार लावण्यास सांगितले. त्यापाठोपाठ पत्रकार सुशील सोई (44) आणि बाळासाहेब खोत (29) या दोघांनीही अशाच प्रकारची धमकी गणात्र यांना दिली. त्यात तडजोडीसाठी 5क् हजारांची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून 1क् सप्टेंबर रोजी गणात्र यांना 25 हजारांची रक्कम घेऊन मधुबन गार्डन येथे बोलावले. दरम्यान, गणात्र यांनी प्रस्तावाला होकार देत आधी भांडुप पोलीस ठाणो गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचून खोत व सोईला अटक केली. आरोपींची 15 तारखेर्पयत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आरोपींकडील ओळखपत्र, अल्टो कार आणि दुचाकी भांडुप पोलिसांनी जप्त केली आहे. (प्रतिनिधी) 

 

Web Title: The extortionist journalist Amol Survey absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.