विद्यापीठ कायद्याच्या सूचनांसाठी १३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:54+5:302020-12-05T04:09:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण ...

विद्यापीठ कायद्याच्या सूचनांसाठी १३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने समिती स्थापन केली आहे. या कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, संघटना, विद्यार्थी, पालक व समाजातील इतर घटकांकडून ४ डिसेंबपर्यंत ऑनलाइन सूचना मागवल्या होत्या. मात्र शिक्षक संघटनांकडून आणि समाज घटकांकडून मुदत वाढवून घेण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे ही सूचना मागवण्याची मुदत १३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने हे सदस्य सचिव आहेत. सूचना www.unipune.ac.in या संकेतस्थळावर ‘सजेशन फॉर अमेंडमेन्ट टू द महाराष्ट्रा पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट २०१६’ या लिंकवर १३ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवता येतील.
...............................