मालाड इमारत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:06 IST2021-06-25T04:06:05+5:302021-06-25T04:06:05+5:30
उच्च न्यायालय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाड इमारत दुर्घटना प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने चौकशी ...

मालाड इमारत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ
उच्च न्यायालय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड इमारत दुर्घटना प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने चौकशी आयोगाला २८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. या इमारत दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात आठ लहान मुलांचा समावेश आहे.
समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश जे.पी. देवधर यांनी मालाड दुर्घटनेची प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यासाठी २८ जूनपर्यंत मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. मुख्य न्या. दीपांकर दत्त व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ही विनंती मान्य करत चौकशी आयोगाला २८ जूनपर्यंत मुदत देत या याचिकेवरील सुनावणी २९ जून रोजी ठेवली.
परिसरातील बेकायदा बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी कोण जबाबदार असेल? तसेच या परिसरात आणखी किती इमारती अनधिकृत आहेत? अशा सर्व मुद्द्यांची चौकशी करून ती माहिती चौकशी अहवालात नमूद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
...........................................