कोस्टल रोडबाबत सूचना पाठविण्यास मुदतवाढ
By Admin | Updated: July 28, 2015 03:12 IST2015-07-28T03:12:18+5:302015-07-28T03:12:18+5:30
मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शन या प्रस्तावित मुंबई सागरीकिनारा रस्त्याबाबत (कोस्टल रोड) नागरिकांना सूचना पाठविण्यासाठी

कोस्टल रोडबाबत सूचना पाठविण्यास मुदतवाढ
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शन या प्रस्तावित मुंबई सागरीकिनारा रस्त्याबाबत (कोस्टल रोड) नागरिकांना सूचना पाठविण्यासाठी महापालिकेने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीनुसार मुंबईकरांना प्रकल्पाबाबत २७ आॅगस्टपर्यंत सूचना करता येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंतच्या प्रस्तावित मुंबई सागरीकिनारा रस्त्याचा प्रस्ताव सार्वजनिक करण्याचे व त्यावर नागरिकांच्या सूचना मागविण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने हा प्रस्ताव पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देत मुंबईकरांकडून सूचना मागविल्या आहेत. या प्रस्तावित प्रकल्पासाठी सूचना पाठविण्याची मुदत एक महिन्याने म्हणजेच २७ आॅगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे. प्रस्तावित कोस्टल रोडचा प्रस्ताव महापालिकेच्या ६६६.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ूँी.१३@ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल किंवा ८िूँी१२िस्र’ॅ@८ंँङ्मङ्म.ूङ्म.्रल्ल या ई-मेलवरही सूचना पाठविता येणार आहेत. तसेच प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) तळमजला, महापालिका अभियांत्रिकी संकुल इमारत, डॉ. ई. मोझेस मार्ग, आचार्य अत्रे चौकाजवळ वरळी, मुंबई-१८ या पत्त्यावर टपालाद्वारे सूचना पाठविता येतील. दरम्यान, या प्रकल्पाबाबत नागरिकांनी सूचना पाठवाव्यात असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.