Join us

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, १० जुलैपर्यंत सादर करता येणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 08:58 IST

https://housing. mhada.gov.in या म्हाडाच्या संकेतस्थळावर क्विक लिंक या विंडोमध्ये इच्छुक अर्जदारांकरिता माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ४ हजार ८२ घरांसाठीच्या लॉटरीकरिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी यंदाच्या लॉटरीतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्याने अद्यापही त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडाकडून गुरुवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, ४ हजार ८२ घरांसाठी ६९ हजार ८०४ अर्ज दाखल झाले आहेत. ४६ हजार अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. अर्ज सादर करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. याआधी ही मुदत २६ जून होती. https://housing. mhada.gov.in या म्हाडाच्या संकेतस्थळावर क्विक लिंक या विंडोमध्ये इच्छुक अर्जदारांकरिता माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

सात कागदपत्रे सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्जदारांना सात कागदपत्रे सादर करावयाची आहेत. यामध्ये अर्जदारांना उत्पन्नाचा दाखला वा प्राप्तिकर विवरणपत्र हे २०२१ - २२ या आर्थिक वर्षातील सादर करावयाचे आहे. सर्व कागदपत्रे सादर करणारे अर्जदार प्रक्रियेत सहभाग घेण्यास पात्र ठरतील. सदनिकांच्या विक्रीकरिता एजंट म्हणून कोणालाही नेमलेले नाही. कोणी काही प्रलोभने देऊन फसवणूक करत असल्याचे आढळल्यास अर्जदारांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ यांच्या कार्यालयास कळवावे.

कुठे आहेत घरे?विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे घरे आहेत.

टॅग्स :म्हाडा