Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका कुर्ला लोकलचा घाटकोपरपर्यंत विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 04:05 IST

नवीन वर्षात गर्दीचा त्रास कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे कुर्ला लोकल आता घाटकोपरपर्यंत चालविण्यात येणार आहे.

मुंबई : नवीन वर्षात गर्दीचा त्रास कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे कुर्ला लोकल आता घाटकोपरपर्यंत चालविण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपासून घाटकोपरपर्यंत लोकल फेरी चालविण्यात येईल.सीएसएमटी स्थानकातून सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांस सुटणारी गाडी घाटकोपर स्थानकात सकाळी १० वाजून ३१ मिनिटांस पोहोचेल. हीच लोकल घाटकोपर येथून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुटून सीएसएमटीला सकाळी ११ वाजून १२ मिनिटांस पोहोचेल. या दोन्ही लोकल गाड्या रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी धावणार नाहीत.कल्याणसाठी सीएसएमटीवरून सकाळी १० वाजून १४ मिनिटांची लोकल कल्याण स्थानकात ११ वाजून ८ मिनिटांस पोहोचेल. ठाण्यासाठी सीएसएमटीवरून सकाळी १० वाजून ६ मिनिटांची लोकल ठाणे स्थानकात सकाळी ११ वाजून ४ मिनिटांस पोहोचेल. घाटकोपर स्थानकासाठी ते ६ फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. 

टॅग्स :मुंबई लोकलमध्य रेल्वे