रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष थुलकरांची हकालपट्टी
By Admin | Updated: February 18, 2017 01:47 IST2017-02-18T01:47:28+5:302017-02-18T01:47:28+5:30
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांची आज पक्षविरोधी कारवायांबद्दल प्रदेशाध्यक्षपदावरून

रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष थुलकरांची हकालपट्टी
मुंबई : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांची आज पक्षविरोधी कारवायांबद्दल प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. रिपाइंचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंत गायकवाड यांनी ही घोषणा केली.
कमळ चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या पुण्यातील रिपाइंच्या निलंबित उमेदवारांचा थुलकर यांनी प्रचार केल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)