एक्स्प्रेस वेवर अपघात; तीन गंभीर

By Admin | Updated: May 22, 2014 03:27 IST2014-05-22T03:27:02+5:302014-05-22T03:27:02+5:30

मुंबई - गोवा महामार्गावर दासगांव गावाच्या हद्दीत बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आय-१० कार आणि मिनिडोअरची समोरासमोर धडक झाली

Expressway accidents; Three serious | एक्स्प्रेस वेवर अपघात; तीन गंभीर

एक्स्प्रेस वेवर अपघात; तीन गंभीर

 दासगांव : मुंबई - गोवा महामार्गावर दासगांव गावाच्या हद्दीत बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आय-१० कार आणि मिनिडोअरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिनिडोअरमधील तीन प्रवासी गंभीर स्वरूपात जखमी झाले. मिनिडोअर (एमएच ०६ - ५०८८) ही महाडवरून गोरेगावकडे जात होती. दासगांव गावाचे हद्दीत समोरून येणारी आय-१० कार (एमएच ०६, बीई १३३६) कारची मिनिडोअरला धडक लागली. या अपघातामध्ये जितेश गजानन शिंदे, २७, रा. वडपाले मिनिडोअर चालक, लक्ष्मी काशीराम चाळके, ६५, सुनीता पांडुरंग चाळके, ३८ दोन्ही राहणार लाखपाले हे गंभीर स्वरूपात जखमी झाले. सर्व जखमींवर दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. हा अपघात काल बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला. कारची धडक एवढी जोराची होती की, मिनिडोअर फूटबॉलसारखी उडत जवळपास ८० फूट रस्त्याकडेला खोल भागात कोसळली. (वार्ताहर)

Web Title: Expressway accidents; Three serious