Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभादेवीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 02:45 IST

९ युवतींची सुटका । तरुणीकडून चालविल्या जाणाऱ्या ‘स्पा’वर कारवाई

मुंबई : कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण मध्य मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर राजरोसपणे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी शुक्रवारी रात्री पर्दाफाश केला. प्रभादेवी येथील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या सिद्धिविनायक होरीझोन टॉवरमधील एका ‘स्पा’वर छापा टाकून वेश्याव्यवसाय करीत असलेल्या ९ तरुणींची सुटका करण्यात आली असून, एकाला अटक केली आहे. अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

प्रभादेवी परिसरात रेजून्वा स्पा एका महिलेकडून चालविला जात आहे़ या ठिकाणी श्रीमंत पुरुष, तरुणांची नेहमी ये-जा सुरू असते़ संबंधित महिलेविरुद्ध मानवी वाहतूक प्रतिबंधक (पिटा) नोटीस बजावण्यात आली असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.सिद्धिविनायक मंदिरापासून अवघ्या २० मीटर अंतरावर असलेल्या सिद्धिविनायक होरीझोन सीएचएस टॉवरमध्ये रेजुन्वा स्पा असून, या ठिकाणी निवासी गाळेही आहेत. या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात असून, एक तरुणी त्याचे नियंत्रण करीत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाचा तात्पुरता पदभार असलेल्या शिवदीप लांडे यांना खबºयाकडून मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी रात्री त्यांनी तोतया ग्राहक पाठवून शहानिशा केली. शारीरिक संबंधासाठी तरुणींना पुरविले जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लांडे यांनी सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी तेथे ९ तरुणी मिळून आल्या. काउंटरवरील सलीम शेख नावाच्या तरुणाने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. या ठिकाणाहून १२ हजार १५० रुपये आणि मोबाइलही जप्त केले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका रात्रीसाठी लाखापर्यंत दर‘रेजुन्वा स्पा’मधून विविध क्षेत्रांतील उच्चभू्र मंडळींना मौजमजा करण्यासाठी तरुणी पुरविल्या जात होत्या. त्यासाठी गिºहाईकांकडून एका रात्रीसाठी सरासरी २० हजारांपासून ते१ लाख रुपये घेतले जात होते, त्यातील निम्म्याहून अधिक रक्कम सेक्स रॅकेट चालविणारी तरुणी घेत असे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी