स्वप्नालीच्या मैत्रिणीलाही आला होता तसाच अनुभव

By Admin | Updated: August 23, 2014 01:03 IST2014-08-23T01:03:45+5:302014-08-23T01:03:45+5:30

रिक्षाचालकाच्या संशयित हालचालीमुळे कापूरबावडी येथे रिक्षातून उडी मारल्याने स्वप्नाली लाड ही जखमी झाली.

The experience of Swapnali's friend was similar | स्वप्नालीच्या मैत्रिणीलाही आला होता तसाच अनुभव

स्वप्नालीच्या मैत्रिणीलाही आला होता तसाच अनुभव

ठाणो : रिक्षाचालकाच्या संशयित हालचालीमुळे कापूरबावडी येथे रिक्षातून उडी मारल्याने स्वप्नाली लाड ही जखमी झाली. मात्र, या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच तिच्या मैत्रिणीलाही रिक्षाचालकाने पुढे नेल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्याच भीतीने स्वप्नालीने उडी मारली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून सत्यता जाणून घेण्यासाठी ती पूर्ण शुद्धीवर येण्याची पोलिस वाट पाहत असल्याचे सूत्रंनी सांगितले. यामुळे या घटनेला पुन्हा एकदा नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 
24 वर्षीय स्वप्नालीने सोमवारपासून वैद्यकीय उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे.  याचदरम्यान, ती काम करीत असलेल्या ठिकाणी आणि त्यांच्या ठाण्यातील दुस:या शाखेतील तिच्या सुमारे चार हजार सहका:यांची चौकशी केली असता त्या वेळी 29 जुलै 2क्14 रोजी ठाण्यातील वसंतविहार येथील तिची एक 25 वर्षीय सहकारी रिक्षाने घरी जात होती. त्या वेळी रिक्षाचालकाने तिने सांगितलेल्या ठिकाणी न थांबवता रिक्षा पुढे नेली होती. मात्र, तिच्या लक्षात येताच तिने चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. तेथून ती पायी परतताना दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ाने तिला लुटण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर, तिने घडलेला प्रकार कामाच्या ठिकाणी सांगितला. त्याच भीतीने स्वप्नालीने रिक्षातून उडी घेतली नसावी ना, अशी भीतीही पोलिसांना सतावत आहे. (प्रतिनिधी) 

 

Web Title: The experience of Swapnali's friend was similar