जुना फ्रीज विकणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:08 IST2021-05-05T04:08:15+5:302021-05-05T04:08:15+5:30

मुंबई : जुना फ्रीज विकत घेण्याच्या नावाखाली अंधेरीतील २८ वर्षीय विवाहितेची ५२ हजार ९८८ रुपयांना फसवणूक करण्यात आली. ठगाने ...

Expensive to sell old fridges | जुना फ्रीज विकणे पडले महागात

जुना फ्रीज विकणे पडले महागात

मुंबई : जुना फ्रीज विकत घेण्याच्या नावाखाली अंधेरीतील २८ वर्षीय विवाहितेची ५२ हजार ९८८ रुपयांना फसवणूक करण्यात आली. ठगाने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून खात्यातील रकमेवर ऑनलाइन डल्ला मारला. या प्रकरणी १ मे रोजी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

......................................

माहीम येथील मेडिकलमध्ये चोरी

मुंबई : माहीम येथील न्यू आशिष मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्सच्या शटरचे लाॅक तोडून तसेच आतील काचेचा दरवाजा ताेडून १६ हजार रुपयांची चाेरी करण्यात आली. १ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत.

....................................

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

मुंबई : कांदिवली पूर्वेकडील क्रांतीनगर भागात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाेलीस चाैकशी सुरू आहे.

.....................................

Web Title: Expensive to sell old fridges