Join us  

नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, भाजपचे राज्यपालांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 6:54 PM

खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

ठळक मुद्देखोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यापालांकडे निवेदनही दिले आहे. 

खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी  चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. 'केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिवरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्वीट करून केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला, राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले, कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा घडवावी, असेही ते म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सरकारमधील मंत्र्यांची विधाने भरकटल्यासारखी

सरकारमधील मंत्र्यांची विधाने भरकटल्यासारखी आहेत.  साठा जर असेल तर तो जप्त करायला सरकारला कुणी अडवलं आहे. तो साठा राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करून द्या. या सरकारचा बोगसपणा उघड झालेला आहे.   सरकारला मदत करायला तयार असताना सरकारचा इगो आणि अहंकार आडवा आला, आमच्यामार्फत इंजेक्शन येत नाहीत, देवेंद्रजी याना क्रेडिट मिळेल आणि आमची नाचक्की होईल, या भावनेतून हे सर्व राजकारण सरकार करीत आहे, असे सांगत बाळासाहेब थोरात यांना इंजेक्शनचे नावही नीट घेता येत नाही, अशी बोचरी टीका दरेकर यांनी यावेळी केली.  

टॅग्स :नवाब मलिकभाजपाभगत सिंह कोश्यारीकोरोना वायरस बातम्या